तेव्हा तो स्टारही नव्हता… या व्यक्तीने शाहरुखला केली होती 3 चित्रपटांची ऑफर, त्याने तीनही चित्रपट नाकारले!


शाहरुख खानने ऋषी कपूर आणि दिव्या भारती स्टारर ‘दीवाना’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज कंवर यांनी केले होते. यानंतर हळूहळू त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आणि आज तो सुपरस्टार आहे. करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात विधू विनोद चोप्राने त्याला एका चित्रपटाची ऑफर केली होती. पण त्याच्याकडे इतर चित्रपट होते, त्यामुळे तो त्यांच्या चित्रपटात काम करू शकला नाही.

विधू विनोद चोप्रा म्हणाले, शाहरुखचा माझ्यासोबत एक इतिहास आहे, मी ‘1942: अ लव्ह स्टोरी’ बनवताना त्याचे काम पाहिले होते. रेणूने ‘माया मेमसाब’ नावाचा चित्रपट केला होता. या चित्रपटात त्याची छोटीशी भूमिका होती. म्हणून मी त्याला ही भूमिका ऑफर केली होती, तेव्हा तो स्टार नव्हता. पण त्याच्यासोबत चित्रपट होऊ शकला नाही. यानंतर विधू विनोद चोप्राने या चित्रपटासाठी अनिल कपूरची निवड केली. याआधी दोघांनी ‘परिंदा’ चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटात त्याच्या विरुद्ध मनीषा कोईराला होती.

विशेष म्हणजे मनीषा कोईरालाच्या आधी माधुरी दीक्षितला तिच्या भूमिकेसाठी अप्रोच करण्यात आले होते, पण ती देखील काही कारणास्तव हा चित्रपट करू शकली नाही. अशाप्रकारे हा चित्रपट आधी अप्रोच झालेल्या कलाकारांना घेऊन बनवला असता, तर माधुरी आणि शाहरुख खानची जोडी ‘1942: अ लव्ह स्टोरी’ या चित्रपटात दिसली असती. हा चित्रपट 1994 साली आला होता. याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला नाही आणि चित्रपट फ्लॉप ठरला.

संजय दत्त आणि आमिर खानच्या चित्रपटासाठी अनिल कपूरच नाही, तर शाहरुख खानलाही अप्रोच करण्यात आले होते. संजय दत्तच्या ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ आणि आमिर खानच्या ‘3 इडियट्स’साठीही शाहरुख खान पहिली पसंती होती. पण काही कारणास्तव त्याने हे दोन्ही चित्रपट केले नाहीत. अशाप्रकारे विधू विनोद चोप्राच्या तीन चित्रपटांसाठी शाहरुख खान पहिली पसंती होती. पण ते दोघेही एकत्र काम करू शकले नाहीत आणि दोघांनी आजपर्यंत एकाही चित्रपटात एकत्र काम केलेले नाही.