विराट कोहली बनला नंबर 1, आता रोनाल्डो आणि मेस्सीही स्पर्धेत नाहीत


विराट कोहलीची गणना महान क्रिकेटपटूंमध्ये केली जाते. तो आधुनिक क्रिकेटचा सर्वोत्तम खेळाडू मानला जातो. लाखो तरुण त्याला आपला आयकॉन मानतात. पण त्याचे नाव फक्त क्रिकेटपुरते मर्यादित नाही. विराट कोहलीचा फिटनेस, फॅन फॉलोइंग आणि या खेळातील त्याचा प्रभाव, यामुळे तो जगातील अव्वल खेळाडूंमध्ये गणला जातो. आता त्याच्या नव्या कामगिरीनेही हे सिद्ध केले आहे. जगातील दोन महान फुटबॉलपटू, क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी देखील त्याच्याबरोबरीला नाहीत.

खरं तर, ‘राँकर्स 100 ग्रेटेस्ट ॲथलीट्स 2024’ च्या यादीत रोनाल्डो आणि मेस्सीला मागे टाकून ‘किंग कोहली’ जगातील नंबर वन ॲथलीट बनला आहे. विराटचे अप्रूव्हल रेटिंग 76 टक्के आहे, तर रोनाल्डोचे 58 टक्के आणि मेस्सीचे 57 टक्के आहे. एवढेच नाही, तर या यादीत समाविष्ट असलेला तो एकमेव क्रिकेटर आहे. इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलो केलेल्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आहे. 628 दशलक्ष इंस्टाग्राम फॉलोअर्ससह रोनाल्डो सर्वात जास्त फॉलो केलेला खेळाडू आहे. मेस्सी (502 दशलक्ष) आणि ड्वेन जॉन्सन (394 दशलक्ष) हा तिसरा सर्वाधिक फॉलो केला जाणारे खेळाडू आहे. तर कोहलीला इन्स्टाग्रामवर 268 मिलियन युजर्स फॉलो करतात.


विराट कोहलीचा गेल्या वर्षी ‘प्युबिटी स्पोर्ट्स’च्या सर्वकालीन महान खेळाडूंच्या यादीत समावेश करण्यात आला होता. या यादीत तो पाचव्या क्रमांकावर होता. या यादीत समावेश झालेला तो एकमेव क्रिकेटपटू होता. त्यानंतर त्याने उसेन बोल्ट, माइक टायसन, लेब्रॉन जेम्स आणि सेरेना विल्यम्स यांसारख्या जगातील सर्वोत्तम खेळाडूंना मागे टाकले.

विराट कोहलीची लोकप्रियता पाहून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश केला होता. याशिवाय, समितीने त्याला 2028 ऑलिम्पिकसाठी जागतिक ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून घोषित केले आहे. विराट कोहलीची तुलना अनेकदा सचिन तेंडुलकरसोबत झाली आहे. त्याने विश्वचषकादरम्यान शतकांचा विक्रमही मोडला. कोहलीने आतापर्यंत 113 कसोटी, 292 वनडे आणि 117 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने 80 आंतरराष्ट्रीय शतकांच्या मदतीने 26000 हून अधिक धावा केल्या आहेत.