
संदीप रेड्डी वंगा यांचा अॅनिमल चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी रेकॉर्डब्रेक कामगिरी केली. त्यानंतर आता त्याचे आकडे सतत आकाशाला भिडत आहेत. मात्र, आदल्या दिवशी चित्रपटाचा व्यवसाय थोडा कमी होता. पण, आता वीकेंडला त्याचे कलेक्शन पुन्हा वाढेल अशी आशा आहे. या चित्रपटाने आतापर्यंत किती कमाई केली आहे ते जाणून घेऊया.
BOX OFFICE Collection : जगभरात ‘अॅनिमल’ची क्रेझ, बॉक्स ऑफिसवर मोडले विक्रम
Sacnilk च्या ताज्या अहवालानुसार, अॅनिमल बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई करत आहे. रिलीजच्या 14 व्या दिवशी या चित्रपटाने भारतात 8.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तथापि, 13 व्या दिवसाच्या तुलनेत हा आकडा थोडा कमी आहे, परंतु असे असूनही, चित्रपटाची चर्चा अजूनही कायम आहे. शेवटच्या दिवसाच्या कलेक्शननुसार, अॅनिमलने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 476.84 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आता लवकरच 500 कोटींच्या क्लबमध्ये पोहोचण्यासाठी सज्ज आहे.
जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले, तर जगभरात अॅनिमलची क्रेझ पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 772.33 कोटींचा व्यवसाय केला आहे. 100 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट लोकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. एवढे कमी बजेट असूनही, अॅनिमल लवकरच शाहरुखच्या चित्रपटांना मागे टाकू शकता.
1 डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला अॅनिमल हा रणबीर कपूरच्या करिअरमधील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरला आहे. या चित्रपटाने सलमान आणि आमिरच्या टायगर 3 आणि दंगलचे रेकॉर्डही मोडले आहेत. त्याचे यश पाहून दिग्दर्शकाने त्याच्या दुसऱ्या भागावरही काम सुरू केले आहे. आता आगामी काळात अॅनिमल रेसमध्ये आणखी कोणत्या चित्रपटांना पछाडणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
