खामगाव (बुलडाणा) – महाराष्ट्रातील टाळ, वारकरी, माळकरी लोकांनी आपापल्या घरातील मुलींना जीन्स, पॅन्ट, टी-शर्ट, तंग आणि तोकडे कपडे घालण्यास बंदी घालावी, असा ठराव मंजूर करण्यात आल्याची माहिती भागवत धर्म परिषदेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष शांताराम महाराज पाळेकर यांनी दिली.
भागवत धर्म परिषदेअंतर्गत यदुवंश समाजाची बैठक जिल्ह्यातील पाळा फाटा येथे झाली.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भागवत धर्म परिषदेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष शांताराम महाराज पाळेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून बुलडाणा जिल्हाध्यक्ष विठ्ठल महाराज निपानेकर, अकोला जिल्हाध्यक्ष ह.भ.प देवळे गुरूजी, शेगाव तालुकाध्यक्ष रामेश्वर कंकाळे, नांदुरा तालुकाध्यक्ष गजानन धांडे, मोताळा तालुकाध्यक्ष बाळू पाटील, भारतीय धर्म परिषद कार्यकर्ते सोमनाथ सावळे, सखाराम आवारकर आदींची उपस्थिती होती.
वारकरी संप्रदायातील अनुयायांनी तोकडे कपडे वापरण्यासोबतच, जीन्स पॅन्ट, टी-शर्ट परिधान करण्याय मनाई के ली आहे. मुलींनी अंग दिसेल असे वस्त्र अजिबात परिधान करू नये, असा ठरावही घेण्यात आला. विशेष म्हणजे मोठा खल झाल्यावर हा ठराव संमत झाला.
यावेळी पायजामा घालणार्या कीर्तनकाराचे कीर्तन ऐकू नये. कीर्तनकारांनी धोतर, टोपी घालावी, कीर्तनकाराचा मुलगा वारकरी संप्रदायाचे काम करीत नसेल तर त्याचे कीर्तन कुणीही ठेवू नये, असे अनेक ठराव यावेळी घेण्यात आले. या बैठकीला राज्यातील टाळकरी, माळकरी, तसेच भागवत धर्म परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते. परिषदेच्या या ठरावामुळे समाजाच्या विवीध स्ततातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यकत होत आहेत.