
मुंबई – अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला हृदयविकाराचा तीव्र झटका आला असून तो अत्यावस्थेत असल्याचे सांगण्यात आले आहे. सिंगापूरमधील एका खासगी रुग्णालयात ‘आयसीसीयू’ विभागात राजनवर उपचार सुरू असल्याचे गुप्तचर विभागातील सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, दाऊदला ठार मारल्याशिवाय मी मरणार नाही, असे त्याने आपल्या जवळच्या व्यक्तींना सांगितल्याचेही कळते.
