पाच भारतीयांचा सौदी अरेबियातील अपघातात मृत्यू

रियाध – सौदी अरेबियात वेगात असलेल्या व्हॅनचे टायर फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात पाच भारतीयांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पाचही मृत भारतीय केरळच्या मल्लपूरम् जिल्ह्यातील आहेत.

तैफ-रियाध एक्सप्रेसवर तैफ येथून १५० किमी अंतरावर रविवारी हा अपघात झाला. मोहम्मद सलीम (३२), मोहम्मद नवाज (२६), नौशाद (२६), थोेंडीयिल कोरू श्रीधरन (३५) आणि कोट्टीयाटील जनार्दनन (४०) अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. मल्लपूरम् येथीलच असलेला आणखी एक जण या अपघातात जखमी झाला असून, त्याला तैफ येथील किंग अब्दुल अझीझ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्याच महिन्यात सौदी अरेबियात झालेल्या एका भीषण अपघातात बालकासह एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला होता.