भारतीय विद्यार्थ्यांचे अमेरिकन ग्रॅज्युएट स्कूलसाठी वाढते अर्ज

वॉशिंग्टन – भारतीय विद्यार्थ्यांची अमेरिकन पदवीधारक विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी अर्जात नाटय़पूर्ण वाढ झाली असून 2013 मध्ये चीनच्या अर्जांमध्ये थोडीशी घट झाल्याची माहिती `कौन्सिल ऑफ ग्रॅज्युएट स्कूल्स’ (सीजीएस) ने दिली आहे. भारताकडून येणाऱया अर्जांमध्ये 32 टक्क्यांची वाढ झाली असून अमेरिकेतील इंटरनॅशनल ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांच्या तुलनेत ती 18 टक्के आहे.

पदवी प्रमाणपत्र मिळविण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱया आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांमध्ये अभियांत्रिकी, आधिभौतिक विज्ञान व भूगर्भशास्त्र हे शिक्षणक्रम लोकप्रिय असून त्यांच्यामधील वाढ अनुक्रमे 14 टक्के, 16 टक्के व 7 टक्के आहे. पदवी प्रमाणपत्रासंदर्भात चीन, भारत, द. कोरिया, तैवान, कॅनडा, मेक्सिको आणि ब्राझील या सात देशातील विद्यार्थ्यांचे अर्ज येत असले तरी चालू वर्षी केवळ भारतीय विद्यार्थ्यांच्या अर्जात मोठय़ा टक्केवारीने वाढ झाल्याची माहिती सीजीएसच्या अध्यक्षा देब्रा डब्ल्यू. स्टीवर्ट यांनी दिली.