पाठींबा… विश्वजित कदमांची उमेदवारीच धोक्यात !

पुणे –  निवडणुकीत आपल्या प्रचारासाठी ‘पेड न्यूज’चा अवलंब केल्याप्रकरणात काँग्रेसचे पुण्यातील उमेदवार विश्वजीत कदम यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पेड न्यूजसंदर्भातील राज्य समितीनेही कदम यांच्यावर ठपका ठेवत त्यांची याचिका  फेटाळून लावली.त्यामुळे विश्वजित अडचणीत सापडले आहेत. प्रचारादरम्यान एका वृत्तपत्रात त्यांना पाठींबा देणारी बातमी प्रसिद्ध झाली होती. 

 मतदानासाठी मतदारांना पैसे वाटल्याप्रकरणी विश्वजीत कदम यांच्याविरोधात अगोदरच गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर आता पेड न्यूज प्रकरणातही कदम अडचणीत सापडले आहेत.पेड न्यूजसंदर्भातील राज्य समितीने वृत्तपत्रातील पाठिंब्याच्या बातमीला हरकत घेतली असून ती पेड न्यूजच असल्यावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे आता केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेण्यावाचून कदम यांच्याकडे गत्यंतर नसून तेथेही विरोधात निकाल आल्यास कदम यांची उमेदवारीच अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे.