
बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघ फिरकीविरुद्ध संघर्ष करताना दिसत असल्याने डावखुरा मनगट फिरकी गोलंदाज कुलदीप यादव पाकिस्तानच्या फलंदाजांना खूप त्रास देऊ शकतो, असे मत पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू रमीझ राजा याने व्यक्त केले. विश्वचषक-2023 च्या भारताच्या सलामीच्या सामन्यात कुलदीपने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार गोलंदाजी केली. त्यानंतर अफगाणिस्तानविरुद्धही तो किफायतशीर दिसला.
IND vs PAK : कोहली-रोहित नव्हे, तर हा खेळाडू आहे पाकिस्तानसाठी मोठा धोका, रमीझ राजाचे मोठे वक्तव्य
या वर्षी 2023 मध्ये भारतीय संघासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज असल्याने, तो शनिवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्ध रोहित शर्मा अँड कंपनीसाठी महत्त्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे. रमीझ राजा म्हणाला, मला विश्वास आहे की विराट कोहली सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरेल आणि निश्चितच महत्त्वाची कामगिरी करेल, कारण तो त्यांच्याविरुद्ध चमकदार कामगिरी करत आहे.
तसेच पाकिस्तानचे गोलंदाजी आक्रमणही कोहलीला अनुकूल आहे. राजा म्हणाला, मला असेही वाटते की कुलदीप यादव सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज असेल. बाबर आझमचा संघ मनगटाच्या फिरकीविरुद्ध संघर्ष करत असल्यामुळे पाकिस्तानला डोळ्यासमोर ठेवून कुलदीप यादवचा संघात समावेश करण्यात आला आहे, असे मला वाटते.
भारताप्रमाणेच, पाकिस्ताननेही विश्वचषकातील त्यांचे दोन्ही सामने जिंकले आहेत, परंतु राजा म्हणाला की बाबर आझम संघाचा प्रमुख फलंदाज असल्याने त्याला स्पर्धेत धावा करणे आवश्यक आहे.
