बारामती : उपमुख्यामंत्री अजित पवार यांच्या मागे लागलेला वादग्रस्ता वक्तव्याचा सासेमिरा त्यांची पाठ सोडत नाही असे वाटते. निवडणुकीच्यां पुर्व संध्येला बारामती तालुक्यातील काही गावांच्या भेटेवेळी सुप्रिया सुळे यांना मतदान केले नाही तर गावचं पाणी बंद करु. तुमचे दोन महिन्यात पाणीप्रश्न सोडवतो, आम्हालाच मतदान करा’ अशी दमदाटी उपमुख्यमंत्री पवार यांनी दिली असल्याची चित्रफीत पुढे आली आहे. त्यामुळे उपमुख्यममंत्री पवार पुन्हाि एकदा दमदाटीच्याा विधानामुळे अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे पवार यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सध्या उन्हाळा सुरु असल्याने बारामती तालुक्यातील काही गावांवर पाणीटंचाईचे संकट ओढावले आहे. बुधवारी रात्री निवडणूक प्रचार संपल्यानंतरही मासाळवाडी या गावामध्ये मतदारांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना मतदान करण्यासाठी दौरा केला. त्यावेळी तेथील काही नागरिकांनी पाणीटंचाईच्याा अडचणी सांगितल्या. त्यावेळी चिडलेल्या पवार यांनी या निवडणुकीत जर सुप्रिया सुळे यांना मतदान केले नाही तर गावचे पाणी बंद करु. तुमचे दोन महिन्यात पाणीप्रश्न सोडवतो, आम्हालाच मतदान करा’ अशी स्वारूपाची दमदाटी केली.
याबाबतचे सर्व पुरावे आपल्याकडे आहेत आणि आपण पोलीस आणि निवडणूक आयोगाकडे अजित पवार यांच्या विरोधात तक्रार केल्याचे आम आदमी पक्षाचे उमेदवार सुरेश खोपडे यांनी सांगितले. त्यामुळे आता निवडणूक आयोगाकडून येत्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.