भाजपच्या एका उमेदवारावर ५० कोटींचा खर्च !

सांगली   –  निवडणुकीच्या प्रचाराचा धुराळा संपला ,आता उद्या मतदान होणार आहे ;पण सत्तेच्या खुर्चीसाठी प्रत्येक पक्षाची ,उमेदवाराची धडपड सुरूच असते,मात्र कोण काय बोलले यानुसारच आरोप-प्रत्यारोपांचा ‘फड’ रंगतो.आता भाजपच्या एका उमेदवाराचा खर्च ५० कोटी रुपयांच्या घरात जात  असल्याच्या  धक्कादायक विधानाची  व्हिडीओ  क्लिप गृहमंत्री आर आर पाटील यांनी मिडियायासमोर सादर केली आहे.  

 भाजप प्रत्येक उमेदवारासाठी 50 कोटी रुपये खर्च करत आहे. असे सांगणारी सदाभाऊ खोत यांच्या आवाजातील व्हिडीओ  क्लिप गृहमंत्री आर आर पाटील यांनी मिडीया समोर दाखविली . तसेच त्याची चौकशी करावी अशी मागणी निवडणुक आयोगाकडे करणार असल्याचे ते म्हणाले.   लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी प्रत्येक उमेदवारासाठी ५० कोटी खर्च करत आहे. असे धक्कादायक वक्तव्य महायुतीचे उमेदवार सदाभाऊ खोत यांनी केले. हे वक्तव्य ‘स्टिंग’द्वारे  पुढे आले आहे.तसेच  त्याची  क्लिप व्हॉट्स अप वर  प्रसारित झाली आहे.