स्वगृही परतले मोहन रावले

मुंबई – शिवबंधन तोडून राष्ट्रवादीत गेलेले शिवसेनेचे माजी खासदार पून्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना कार्यध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या गिरगाव येथील जाहीर सभेत मोहन रावले पून्हा स्वगृही परतले आहेत. यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीका केली.

शिवसेना पक्षातर्फे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून पाच वेळा खासदार झालेल्या मोहन रावलेंनी काही महिन्यांपुर्वीच शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. यानंतर त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. मात्र, तेथेही त्यांच्या पदरी निराशा आल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा आश्रय घेतला. 

शिवसेनेने रावले यांना लोकसभेची उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे त्यांनी तडकाफडकी मनसेत प्रवेश केला होता. मात्र, दक्षिण मुंबईत त्यांना मनसेची उमेदवारी मिळाली नाही. म्हणून त्यांनी राष्ट्रवादीचा पर्याय निवडला. आता मात्र ते पून्हा शिवसेनेत परतले आहेत.