काबुल – अफगाणिस्तानचे सार्वजनिक बांधकाम उपमंत्री अहमद शाह वाहिद यांचे अज्ञात पाच बंदुकधाऱयांनी मंगळवारी अपहरण केले. अपहरणापूर्वी वाहिद यांच्या कारवर गोळीबार करण्यात आला, तसेच चालकावरही गोळय़ा झाडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सार्वजनिक बांधकाम मंत्रालयाचे प्रवक्ते सोहेल काकर यांनी दिलेल्या माहितीनुसार राजधानी काबुलमधून उपमंत्री वाहिद हे मंगळवारी सकाळी सात वाजता उत्तर काबुलला एका कामाच्या ठिकाणी आपल्या कारमधून निघाले होते. याचवेळी समोरून आलेल्या पाच अज्ञात बंदुकधाऱयांनी वाहिद यांच्या कारचालकावर गोळय़ा झाडल्या, त्यानंतर जखमी स्थितीतही चालकाने कार सुरक्षितपणे पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण हल्लेखोरांनी कारचा पाठलाग करून कारमधील वाहिद यांना बाहेर ओढून दुसऱया कारमधून त्यांचे अपहरण केले. ही घटना खिर खाना जिल्हय़ात घडली.
हल्लेखोर हे तालिबानी दहशतवाद्यांशी निगडीत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, तालिबान्यांचा प्रवक्ता झैबुलीद्दीन मुजाहीद याने मात्र आपल्याला वाहिद यांच्या अपहरणाची माहिती नसल्याचे स्पष्ट केले आहे.