पुणे: लोकसभा निवडणूकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांनी वेगवेगळया आयडीया शोधून काढल्या आहेत. त्यांच्या या नवीन आयडीयांना मतदारांचा ही प्रतिसाद लाभत असल्या ने ही मंडळी भलतीच खूश दिसत आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवारांकडून देवदर्शनाची सोय करण्यात आली आहे. या सहलीमुळे राज्यांतील देवदर्शनाची ठिकाणी गर्दीने फुलून गेली आहेत.
तुळजापुरमध्ये सध्या यात्रा सुरू आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसापासून चैत्री यात्रेचे निमित्त साधत विविध पक्षाच्या उमेदवारांनी मतदारांना धार्मिक स्थळांची यात्रा घडवायला सुरूवात केली आहे. राजकीय पक्षांच्या ट्रॅव्हल्सच्या गाड्यांनी सध्या धार्मिक स्थळे भरून गेलेली पहायला मिळत आहेत. तुळजापुरातल्या यात्रेत सध्या अशाच भाविक मतदारांची गर्दी झाली आहे.
साडेचार वर्षात मतदारांकडे वळूनही न पाहणारे उमेदवार सध्या मतदारांना धार्मिक स्थळांची सहल घडवून देत आहेत. मतदार ही देव दर्शनाची आलेली संधी न सोडता उमेदवाराने पाठवलेल्या ट्रॅव्हल्समध्ये पाहुणचाराचा आनंद घेत देवदर्शन घेत आहेत. त्यामुळे अशा मतदारामुळे राज्यातील देवदर्शनाची ठिकाणी गर्दीने फुलून गेली आहेत.