… विकतचे पाणी ;मग मतदान कशाला ?

शहापूर – पाण्यासाठी वणवण फिरायचे नाही तर पाण्यासाठी पैसे मोजायचे,ही परिस्थिती काही बदलत नाही त्यामुळे मतदानच करायचे नाही असा पवित्रा सुमारे एक हजार पंचवीस आदिवासींनी घेतला आहे. 

ही वस्तुस्थिती आहे, पालघर लोकसभा मतदार संघातील रामपूर गावीत पाडा गावात. येथील  लोकांनी यंदा मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. विक्रमगड तालुक्यात हे गाव येते.या आदिवासी गावाची लोकसंख्या 1 हजार 250 आहे. तर मतदारांची संख्या आहे 1 हजार 25. गावात अजूनही पाण्याचे नळ नाहीत. त्यामुळे लोकांना 1 ते 2 किलोमीटर पायपीट करुन पाणी आणावे लागत आहे. नाहीतर पाणी चक्क विकत घ्यावे लागत आहे.विक्रमगड तालुक्याची निर्मिती होण्यापूर्वी रामपूर गावितपाडा हे गाव महसूल गाव म्हणून घोषित करण्यात आले होते. परंतु आजही  तशी नोंद सरकार दरबारी नाही. त्यामुळेच सुविधा मिळत नाही ,असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे .