रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून तळकोकणात काग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत वाद सुरू आहे. आगामी काळातील निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद चांगलाच रंगला आहे. हा आता आघाडीपुरताच मर्यादीत राहिला नाही आहे. यामध्ये शिवसेनाही या वादाची झळ बसत आहे. येथील शिवसेनेचे नेते गौरीशंकर खोत यांच्या गाडीवर सोमवारी रात्री अज्ञातांनी हल्ला चढवला. या हल्ल़यामागे राणे समर्थक असल्याचा दावा शिवसेनेनी केला आहे.
सोमवारी रात्री रत्नागिरी शहरात विनायक राऊत यांचा प्रचार करण्यासाठी शिवसेनेचे नेते गौरीशंकर खोत काही कार्यकर्त्यासह शहरात दाखल झाले होते. त्यावेळी काही जणांनी त्यांयच्याा गाडीवर काही अज्ञातांनी हल्ला केला. दरम्यान हा हल्ला नारायण राणेंच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप खोत यांनी केला आहे. या प्रकरणाची तक्रार त्यांनी पोलिस ठाण्यानत दिली आहे.
यापूर्वी खोत यांचे नारायण राणेंशी चांगले संबध होते. मात्र खोत यांनी काहीच महिन्यांपुर्वी काँग्रेसमधून शिवसेनेत गेले आहेत. त्यातच आता केसरकरांनी राणेंविरोधात पुकारलेला एल्गार आणि शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केसरकरांचे केलेले कौतुक याचा परिणाम होत आहे.त्यामुळे आता आगामी काळात शिवसेना नेत्यावर हल्ले होण्यालची शक्यता आहे.