काँग्रेसने संविधानात्मक संस्था नाहीशा केल्या – नरेंद्र मोदी

पुणे,- गेली दहा वर्षे देशाचे सरकार ‘अपघाताने पंतप्रधान झालेल्या व्यक्तीच्या नावावर चालवले जात आहे प्रत्यक्षात निराळी व्यक्तीच सरकार चालवत आहे आणि त्याचा सर्वात मोठा तोटा म्हणजे घरी बसून सरकार चालवणार्‍या सेहजाद्यांनी व त्यांच्या मातोश्रींनी सरकारचे, कॅबिनेट व पंतप्रधानांचे निर्णयाचे कागद लोकांच्या समोर फेकून देणे सुरु केले, असे भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार श्री नरेंद्र मोदी यांनी पुण्यात भाजपचे उमेदवार अनिल शिरोळे यांच्या प्रचारसभेत बोलताना सांगितले. स. प महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर झालेली ही सभा प्रचंड गर्दीची तर होतीच पण दूरवरच्या चौकातही उभे राहून लोक भाषण ऐकत होते.
‘पंतप्रधानांच्या कार्यालयातील एका जबाबदार अधिकार्‍यानेचअपघाताने पंतप्रधान झालेल्यांच्या नावावर सेहेजादे व त्यांची आईच सरकार चालवत होती, असे आज प्रकाशित झालेल्या पुस्तकाचा उल्लेख करून श्री मोदी म्हणाले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधानातून एक व्यवस्था दिली. त्या व्यवस्थेचे आधार असलेल्या संस्थाच या सहेजादे कंपनीने निरपयोगी केल्या. त्याची उदाहरणे देताना ते म्हणाले, कॅग चे प्रमुख असलेल्यांशी यांचाच मतभेद झाला. नियोजन आयोगाची रचना काही दृष्टीकोनातून केलेली होती त्याऐवजी या मंडळींनी आपण परस्पर निर्णय घेणे सुुरू केले. मंत्र्याचा अधिकार फक्त सही पुरता ठेवला. टू जी स्पेक्ट्रम चा अभ्यास करणार्‍या यंत्रणेशीच यांचे जाहीर मतभेद झाले. सीबीसीबाबतचे निर्णय कोर्टात जावून सोडवावे लागले. यापूर्वी कधीही झाले नव्हते असे मतभेद झाले.

या सरकारचा अजून एक मोठा दोष सांगताना ते म्हणाले, ज्या मंत्र्यांनी भ्रष्टाचार केला किंवा अकार्यक्षमतेने सरकार चालवले, अशाच लोकाना या सरकारने प्रमोशने दिली. यांच्या परराष्ट्रमंत्र्याने युनोमध्ये जावून दुसर्‍या देशाचेचे भाषण वाचून दाखविले तर शिंदे नावाच्या ऊर्जा मंत्र्याने सारा देश अंधारात ढकलला तरीही या दोघांना बढती देण्यात आली. शिंदे यांना तर गृहमंत्रीपद देण्यात आले. एका मंत्र्यांची पत्नी सरकारी योजनांचे पैसे काही संस्था चालवून भ्रष्टाचार करत होती. हा प्रकार उजेडात आल्यावर त्या मंत्र्याला जाब विचारण्याऐवजी त्यांना परराष्ट्र मंत्री करण्यात आले. कॉमनवेल्थ गेममध्ये चार हजार रुपयांचा नॅपकिन पेपर वापरणार्‍या दिल्लीच्या मुख्यमंत्री शिला दीक्षीत यांना राज्यपाल करण्यात आले. आपले सध्याचे परराष्ट्र मंत्री असे आहेत की, त्यांनी चीनला गेल्यावर आपल्या देशातील महत्वाच्या मुद्यांचा पाठपुरावा करण्याऐवजी ‘मला चीनमध्ये कायम राहायला आवडेल, अशी प्रतिक्रिया दिली.

या देशातील तरुणांना रोजगार हमी देण्याचे आश्वासन असणार्‍या ‘नरेगा’मध्ये पाच कोटी जणांनी रोजगारांची मागणी केली असताना फक्त 45 लाखांना रोजगार दिला. त्यात चाळीस हजार रुपये कसे खर्च झाला याचा अजून पत्ता लागलेला नाही. सध्याचे सरकार अन्नसुरक्षेचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, रोजगारांचा अधिकार देण्याचा कायदा केल्याचा दावा करते पण हा अधिकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानानेच या जनतेला दिला आहे. हे सरकार जे आरटीआय व ओबीसी यांच्याबाबत कायदे केल्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करते ते कायदे ते जम्मू, काश्मीरला लागू करू शकलेले नाही.

जगात कोठेही भारताचा काळा पैसा असेल तर तो परत आणू असे सांगताना ते म्हणाले, सध्या याबाबत पंजाबमध्ये एक विषय गाजतो आहे, तो म्हणजे तेथील माजी मुख्यमंत्री अमरेंद्रसिंग सध्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यांनी परदेशात बँकेत जी हजार कोटी डॉलरची ठेव ठेवली आहे ती त्यांच्या निवडणूक पत्रात दाखविली नाही, असे त्यांना निवडणूक अधिकार्‍यांनी विचारले आहे. वास्तविक अशा काळ्यापैशावर देशाचा अधिकार आहे आणि त्यावर कारवाईही झाली पाहिजे. हा विषये मुद्दाम दाबून ठेवला जात आहे. परदेशात ठेवलेल्या सार्‍याच काळ्या पैशाबाबत आमची तो पैसा परत आणण्याची भूमिका आहे, असेही मोदी यांनी बोलून दाखविले.