मुलायमसिंगांच्या पक्षाची मान्यता रद्द करा- उद्धव ठाकरे

मुंबई- गेल्या काही दिवसांपासून समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंग यादव यांना बलात्कार्यांचा कळवळा आलेला दिसत आहे. त्यामुळे आता मुलायमसिंग यादवांच्या पक्षाची मान्यता रद्द करा अशी मागणी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुलायमसिंग यांनी केलेल्या वक्तमव्यािनंतर आता निवडणूक आयोग आता त्यांच्यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यादवांचे ‘उत्तर प्रदेश’ हे बलात्कारांचे माहेरघर असल्याचा टोला हाणत तेथील राजकीय गुंडांना ‘पुरुषार्थ’ गाजवूनही संरक्षण मिळते, विधानसभेतही पाठवण्यात येते असे लेखात म्हटले आहे. मुलायम जे बरळले ती विकृती असून मुसलमानी मतांसाठी राजकारणी कोणती हीन पातळी गाठतील ते सांगता येत नाही, असे सामन्याच्याा अग्रलेखातून म्हटले आहे.

शक्तील मिल परिसरात झालेल्या बलात्कारातील आरोपी हे मुसलमान असल्यामुळे मुलायम यांना हा मानवतेचा पुळका आला आहे काय? असा प्रश्नही लेखात विचारण्यात आला आहे. दरम्यान या लेखात मुलायम यांच्यासह अबू आझमी यांच्यावरही टीकेचा आसूड ओढण्यात आला आहे. त्यातमुळे त्यां च्याचवर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे.