पदवीमुळे राष्ट्रवादीचे संजीव नाईक अडचणीत

मुंबई: राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचे चिरंजीव खासदार संजीव नाईक दुस-यावेळेस ठाणे लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉग्रेंसकडून नशीब आजमावत आहेत. केवळ बारावी पास असलेल्याघ संजीव नाईक यांनी त्यांच्या नावाआधी डॉक्टर ही पदवी लावली आहे. तर उमेदवारी अर्जात त्यांने केवळ बारावी उत्तीर्ण असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ते आता अडचणीत सापडले आहेत.

खासदार संजीव नाईक हे ठाणे लोकसभा मतदार संघांतून राष्ट्रवादीच्या तिकीटावर नशीब आजमवात आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करताना खासदार संजीव नाईक यांनी आपण केवळ 12 वी पास असल्याची माहिती सादर केली आहे. त्यामुळे नाईक यांचे पदव्युत्तरचे तर सोडाच, साधे पदवीपर्यंतचे शिक्षणही झाले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नाईक यांना कोणत्या विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी दिली असा सवाल उपस्थित झाला आहे.

संजीव नाईक यांनी इंटरनॅशलन तामिळ युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलॅण्ड या विद्यापीठाकडून आपल्याला ही मानद पदवी मिळाली असल्यावची माहिती दिली आहे. या विद्यापीठाने ज्या विषयासाठी नाईक यांना पदवी बहाल केली आहे. तो विषय इंटरनेटवर सापडत नाही. त्याामुळे नाईक हे निवडणुकीपुर्वी चांगले अडचणीत सापडले आहेत.