वेलिंग्टन – ब्रिटनचा बेबी प्रिन्स जॉर्ज आपले पालक केट आणि विलियम्स यांच्यासह सोमवारी न्यूझीलंड दौर्यावर रवाना झाला असून त्याची ही पहिलीच अधिकृत परदेशवारी आहे. जोरदार पाऊस आणि वेगाने वाहणार्या वार्यानी रॉयल फॅमिलीचे विमानतळावर स्वागत केल्याचेही वृत्त आहे. विलियम्स केट तीन आठवड्यांच्या टूरवर असून ते या दरम्यान न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाला भेट देणार आहेत.
जन्मानंतर बेबी प्रिन्स जॉर्ज प्रथमच सार्वजनिक ठिकाणी दिसत आहे. इतकेच नव्हे तर युवराज्ञी केटही प्रथमच न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाला जात आहे. तेथे या कुटुंबासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले असले तरी कांही ठराविक कार्यक्रमांनाच प्रिन्स जॉर्जला नेले जाणार आहे. न्यूझीलंडचे पंतप्रधान जॉन के यांनी या कुटुंबाचे जोरदार स्वागत केले जात असल्याचे सांगून त्यांना सेलिब्रिटीप्रमाणेच वागविले जात आहे असेही सांगितले.