अमेरिकेपेक्षा भारतात उपयुक्त ठरतील हायब्रीड कार

मुंबई- पेट्रोल व डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे या इंधनाचा पर्याय जगभरात शोधले जात आहेत. विकसित देशांमध्ये हायब्रीड कार हा पर्याय तयार झाला आहे. या कार पेट्रोल, डिझेलसोबत वायूवर चालतात. अमेरिका, चीनपेक्षा या कार भारतात अधिक उपयुक्त ठरू शकतात, असा दावा भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञाने केला आहे. भारत आणि चीनमधील शहरांमध्ये गाडी चालवणे हे वैफल्य आणणारे असते. 

वाहतूक कोंडी, चालकांशी आक्रमक शैली, मुक्त मार्गाची कमतरता आदींमुळे हायब्रीड कार्स या इंधन वाचवणा-या ठरू शकतात, असे अमेरिकेच्या एनर्जी विभागाचे संशोधक लॉरेन्स बर्कले यांनी सांगितले. अन्य क्षेत्रांपेक्षा भारत आणि चीनमधील वाहतूक क्षेत्रातून बाहेर पडणारे प्रदूषण वाढत आहे. मात्र या देशांमध्ये वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे हायब्रीड आणि विजेवर चालणा-या वाहनांमुळे कार्बन उत्सर्जन आणि प्रदूषण कमी होऊ शकेल, असे भारतीय वंशाचे संशोधक आनंद गोपाल यांनी सांगितले. भारतात हायब्रीड कार या अधिक इंधन वाचवणा-या ठरू शकतात. भारतात सध्या इंधन तपासणी प्रक्रिया वापरली जाते. 

पारंपरिक इंधनाच्या तुलनेत या गाड्या २९ टक्के इंधन अधिक वाचवतात, असा निष्कर्ष तिने काढला. बर्कले यांच्यासोबत आनंद गोपाल, सामवेग सक्सेना आणि अमोल फडके यांनी या संशोधनात सहभाग घेतला. या संशोधकांनी प्रत्येक देशात जास्त खपणा-या कारची सिम्युलेशन मॉडेल्स तयार केली. नवी दिल्ली आणि पुण्यातील वाहतुकीच्या स्थितीचा अभ्यास केला. त्यात इंधनाच्या बचतीची माहिती देण्यात आली. चीनच्या ११ शहरांमध्ये आणि तीन हायब्रीड इंधनावर चालणा-या कार्सचा अभ्यास केला. 

अमेरिकेपेक्षा भारत व चीनमध्ये महामार्गावर हायब्रीडने कार चालवल्यास इंधनात अनुक्रमे ४७ ते ४८ टक्के आणि चीनमध्ये ५३ ते ५५ टक्के बचत होते, असे आढळले. अमेरिकेत हायब्रीड कारच्या इंधन बचतीचे प्रमाण ४० टक्के आहे. भारत आणि चीनमध्ये हायब्रीड आणि वीजेवर चालणा-या वाहनांची बाजारपेठ मोठी आहे. या संशोधनाची माहिती ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ पॉवरट्रेन्स’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.