अडवाणीने टाळला मोदींचा उल्लेख

औरंगाबाद : गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्या मनात असलेला भाजपचे पंतप्रधापदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या विषयी असलेला राग कमी होत नाही असे दिसते. औरंगाबाद येथे एका कार्यक्रमानिमित ते आले असता त्यांनी मोदी यांच्या नावाचा उल्लेख टाळून त्यांच्या विषयी असलेला राग कायम असल्याचे दाखवून दिले आहे.

जालना लोकसभेचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना अडवाणी म्हणाले, ‘सध्या बाळासाहेब ठाकरे हयात नाहीत, अटलबिहारी वाजपेयी प्रचारात नाहीत, तरीही या निवडणुकीचा निकाल वेगळा असेल. याचे श्रेय मतदार आणि काँग्रेसलाच आहे. काँग्रेसने केलेल्या महाभ्रष्टाचारामुळेच हे झाले. त्यांच्या भ्रष्टाचारासमोर कुणीच टिकू शकत नाही, असे सांगून भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी मोदी लाट, करिष्मा आदींचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळला.

ही त्यांची पहिलीच प्रचारसभा असल्याचे सांगत अडवाणी म्हणाले, १९५२ पासून झालेल्या सर्व १६ निवडणुकांमध्ये मी सहभागी झालो आहे; परंतु यावेळी जसे वातावरण आहे, तसे पूर्वी कधीही नव्हते. यापूर्वी १९९९ मध्ये काँग्रेसला सर्वात कमी ११४ जागा मिळाल्या होत्या. या वेळेस काँग्रेस तीन आकडी संख्या गाठेल, असे कुणीही म्हणत नाही. याचे श्रेय मतदार व काँग्रेसलाच द्यायला हवे, असेही यावेळी बोलताना आडवाणी म्हणाले.