
कैरो – इजिप्तमध्ये २६ आणि २७ मे रोजी राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदान होत असून मतदानाचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाणार आहे. निवडणूक आयोगाकडून दिल्या गेलेल्या माहितीनुसार जर दुसर्याज टप्प्यात मतदानाची गरज पडलीच तर पहिल्या टप्प्यातील मतदान जूनच्या मध्यात घेतले जाणार आहे आणि निकाल २६ जूनला जाहीर केला जाणार आहे.
