पाक सरकार आणि तालिबान मध्ये शांतीवार्ता सुरू

पेशावर – पाकिस्तान सरकार आणि तेहरीक ए तालिबान पाकिस्तान यांच्यात उत्तर वझिरीस्तान भागात अज्ञात स्थळी शांती वार्ता सुरू झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. मंगळवारीची ही चर्चा सुरू होणार होती मात्र हवामानातील बिघाडामुळे ती पुढे ढकलली गेली होती. बुधवारी सायंकाळपासून ही चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. तालिबानी हिंसाचारात पाकिस्तानात आत्तापर्यंत ४० हजार लोकांना प्राण गमवावे लागले आहेत.

या चर्चेत प्रामुख्याने हिंसाचार थांबविण्याबद्दल आणि तालिबान्यांनी अपहरण कलेल्या राजकीय आणि महत्त्वाच्या व्यक्तींच्या सुटकेबाबत बोलणी होणार आहेत. या शांतीवार्तेसाठी कांही पत्रकारांनाही नेले गेले आहे. चर्चेत सहभागी होणारे सरकारी नेते विमानाने तर तालिबानी नेते हेलिकॉप्टरने चर्चास्थळी रवाना झाले.

पाक सरकारच्या नव्या नीतीप्रमाणे माजी राजदूत रूस्तम शाह मोहम्मद, अतिरिक्त मुख्य सचिव फाटा अरब आरिफ, सचीव हबीबुल्ला खटक, पंतप्रधानांचे अतिरिक्त सचिव हसन फवाद चर्चेसाठी गेले आहेत तर मध्यस्त म्हणून जमियत उलेमा इस्लाम मौलाना सैमुल हक, इब्राहमखान, जेयूटी प्रवक्ता मौलाना युसुफ शाह हे बोलणी करणार आहेत.