
कैरो – इजिप्तचे माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांचे समर्थन करणा-या ५०० हून अधिक जणांना पोलिसांची हत्या तसेच इतर हिंसक घटनांप्रकरणी दोषी ठरवत न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. इजिप्तमधील मिन्या येथील न्यायालयाने हा निर्णय दिला. मोर्सी यांच्या एकूण ५२९ समर्थकांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या सुनावणीदरम्या न्यायालयाने २६ जणांची सुटका केली आहे.
