इस्लामाबाद – पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या लाहोर जवळील फार्महाऊसवर पाळलेल्या मोरावर मांजरांनी ताव मारल्यामुळे तीन पोलिसांना निलंबित करण्यात आल्याचे वृत्त आहे. मंगळवारी ही घटना उघडकीस आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शरीफ यांनी मोर पाळला होता. मंगळवारी लॉनवर हा मोर मेलेल्या अवस्थेत माळ्याला दिसला. अधिक तपासात हा मोर मांजरांनी खाल्याचे उघडकीस आले. या फार्महाऊसवर २४ पोलिस बंदोबस्तासाठी होते. त्या सर्वांची पोलिस सुपरिटेंडेंट अर्शन यांनी चौकशी केली. त्यातील लॉनच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या तीन पोलिसांना या घटनेबद्दल दोषी ठरवून निलंबित करण्यात आले.
निलंबित केलेल्या पोलिसांनी रात्रीच्या वेळी मांजरे मोराला खातील ही कल्पनाच आली नाही असा बचाव करण्याचा प्रयत्न केला पण तो निष्फळ ठरला आणि त्यांना नोकरीवर पाणी सोडावे लागले.