पर्सनल संगणक, इंटरनेट उपकरणे, सेलफोन, टिव्ही अशा वस्तूंच्या उत्पादनासाठी चीनने भारतात गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे. चीनचे उद्योग विभागाचे उपमंत्री यांग झिशान यांनी भारतात गुंतवणुकीस चिनी कंपन्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी खास प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. ते म्हणाले की भारताच्या औद्योगिक पार्कमध्ये चिनी कंपन्यांनी गुंतवणूक करावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
भारत आणि चीन यांच्यातील द्विपक्षीय व्यापार वाढावा यासाठी दोन्ही देशातील सरकारे आणि उद्योग क्षेत्रात तसेच सामाजिक संघात संदेश दळणवळण वाढणे गरजेचे आहे. भारताचा सॉफ्टवेअर उद्योग आणि चीनचे हार्डवेअर उद्योग एकत्र आले तर या क्षेत्राच्या जागतिक बाजारावर वर्चस्व गाजवू शकणार आहेत. भारत सरकारनेही सकारात्मक प्रतिसाद दिला असून चीनसाठी स्पेशल टेक्नोपार्क उभारण्याची तयारीही दाखविली आहे. चीनच्या संबंधित अधिकार्यांनी भारतातील कांही ठिकाणांना भेटीही दिल्या आहेत.
मे मध्ये होत असलेल्या भारतातील सार्वत्रिक निवडणुका पार पडल्यानंतर चीन भारतात औद्योगिक गुंतवणुकीसंबंधीचा निर्णय घेणार आहे असेही झिशांग यांनी सांगितले.