
जालंदर- आगामी निवडणुकात युवा वर्गाने आवर्जून मतदान करावे यासाठी जालंदरचे निवडणूक अधिकारी अणि जिल्हाधिकारी वरूण रूजम यांनी प्रथम मतदान करणार्या मतदारांना मोबाईल खरेदीवर १० टक्के सूट दिली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. आपल्या अन्य सहकारी अधिकार्यासोबत घेतलेल्या बैठकीत यांनी यासंदर्भातला निर्णय जाहीर केला असून त्याच्या अम्मलबजावणीसाठी शहरातील कांही प्रमुख इलेक्ट्रोनिक दुकानदारांशी सहकार्याचे आवाहन केले आहे. या दुकानदारांनीही त्यांना सहकार्य करण्याची तयारी दाखविली आहे.
