पुणे/ प्रतिनिधी – पार्टी विथ द डिफरन्स; केडर पार्टी अशी बिरुदावली मोठ्या तो-यात मिरविणा-या भारतीय जनता पक्षाचे वेगळेपण संपुष्टात येत आहे. कोणत्याही परिस्थितीत यावेळी सत्ता मिळवायचीच; या उद्दीष्टाने पक्षाने राज्यात 1/4 लोकसभा मतदारसंघात इतर पक्षातून आयात केलेले उमेदवार दिले आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था आहे. सुरुवातीच्या काळापासून या पक्षात संघातील आणि परिवारातील कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात आला आहे. आजही संघशाखा, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद मार्गे भाजप असा स्वयंसेवकांचा मार्ग असतो. मात्र आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवायचीच आणि नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाच्या सिंहासनावर आरूढ करायचेच या निर्धाराने पक्ष मैदानात उतरला आहे. त्यासाठी प्रत्येक जागा महत्वाची ठरत असल्यामुळे पक्षाने आपले वेगळेपण बाजूला ठेऊन इतर पक्षांप्रमाणेच फोडाफोडीचे राजकारण करण्याचा मार्ग अंगीकारला आहे. मात्र त्यामुळे वर्षानुवर्ष चणे-चुरमुरे खाऊन पक्षकार्य करणा-या प्रामाणिक पक्षकार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण पसरले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाने राज्यात आपल्या वाट्याला आलेल्या जागांपैकी तब्बल 1/4; म्हणजे सात जागांवर इतर पक्षातून आयात केलेल्या उमेदवारांना तिकीट दिले आहे. नांदेड येथे राष्ट्रवादी काँग‘ेसमधून आलेले डी बी पाटील, सांगली येथे राष्ट्रवादी काँग‘ेसमधून आलेले संजय पाटील, धुळे येथे शिवसेनेतून आलेले सुभाष भामरे, भिवंडी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे कपिल पाटील, राष्ट्रवादीचे नंदूरबार येथील ज्येष्ठ मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या कन्या डॉ. हीना गावित यांना भाजपने गळाला लावले आहे. यापैकी बहुतेकांना उमेदवारी बहाल करण्यात आली आहे; तर उरलेल्यांना दिली जाणार हे निश्चित आहे.
पक्षाच्या या खेळीने कदाचित या निवडणुकीत खासदारांच्या सं‘येत वाढ होईलही. मात्र वर्षानुवर्ष पक्षासाठी खस्ता खालेल्ल्या कार्यकर्त्यांना दूर ठेऊन नव्याने दाखल झालेल्यांना उमेदवारी दिल्याने पक्षाचे वेगळेपण पक्षातील प्रामाणिक कार्यकर्त्यांमध्ये तीव‘ नाराजी पसरली आहे; हे निश्चित!