पुणे – मराठी ही जगातील 10 व्या क्रमांकाची भाषा आहे. मात्र आपल्याकडे एक् हजाऱ पुस्तकांची अवृत्ती संपायला 3 ते वर्षे लागतात यामुळे आपण खरोखरच सुसंस्कृत आहोत का याचा विचार करण्याची गरज आहे. कारण वाचनामुळे नविन विचारांना चालना मिळते, नवनिर्मिती होते असे मत ज्येष्ठ साहित्यीक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी मंगळवारी व्यक्त केले.
अखिल भारतीय मराठी बालकुमाऱ साहित्य संस्थेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण डॉ. कोत्तापल्ले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. न. म. जोशी होते. कार्यवाह सुनिल महाजन, कोषाध्यक्ष अनिल कुलकर्णी यावेळी उपस्थित होते. ज्येष्ठ बालसाहित्यीक डॉ. सुरेखा पाणंदीकर यांना जिवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, आपण श्रवण संस्कृतीमध्ये वाढलो आहोत आता आपल्याला वाचनसंस्कृतीकडे वळायचे आहे. मराठीत काही पुस्तकांचा विक्रमी खप होतो मात्र ती पुस्तके कितपत वाचली जातात या विषयी शंका आहे. काही लोक फक्त प्रतिष्ठेसाठी आपल्या दिवाणखान्यात ही पुस्तके ठेवतात. यामुळे आपले वैचारिक दारिद्रय दुर करून मुलांना सुसंस्कृत काण्यासाठी वाचन चळवळीस प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. बालसहित्याला कमी रकमेचे पुरस्कार दिले जातात त्यामध्ये बदल करून शासनाने बालसाहित्याच्या पुरस्कारांची रक्कम वाढवावी अशीही मागणी त्यांनी केली.
पुस्तकांच्या किमती वाढल्याचे बोलले जाते मात्र आज इतर किमतीच्या तुलनेत फार कमी किमतीमध्ये पुस्तके उपलद्ध होतात असे सांगत डॉ. कोतापल्ले म्हणाले, भारतीय भाषांमध्ये मुलांची मानसिकता कशी असेल याचा विचार न करता मुलांना काय आवडेल याचा विचाऱ करून साहित्य निर्मिती केली जाते त्याऐवजी मुलांच्या मनोवृत्तीत शिरता येइल अशा लिखाणाची आवश्यकता आहे. तसेच विद्यापीठ पातळीवर बालसाहित्यावऱ संशोधन व्हावे यासाठी प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे.
डॉ. पाणंदीकर म्हणाल्या, भारत देश हा कथासागर आहे. जुन्या कथांना नविन रूपात मांडण्याची आज आवश्यकता आहे. संगणक, आयपॅड या माध्यमातुन बालसाहित्य मुलांपर्यंत पोहचायला हवे कारण मुलांचे विश्व ज्या झपाट्याने बदलत आहे त्याच गतीने साहित्यामध्ये बदल व्हावेत, तसेच बालसाहित्यामध्ये व्यावसायीकता आणण्याची गरज आहे त्या शिवाय साहित्य वृंद्धींगत होउन त्याला उर्जित अवस्था प्राप्त होणार नाही. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिल महाजन यांनी केले.