बिजिग – जगात शस्त्रास्त्र निर्यातीत चीनने आघाडी घेतली असून जगातील चार नंबरचा निर्यातदार देश म्हणून स्थान मिळविले आहे. गेल्या पाच वर्षात चीनने फ्रान्सला शस्त्र निर्यातीत मागे टाकून हे स्थान मिळविले असून या काळात चीनच्या शस्त्र निर्यातीत तब्बल २१२ टक्के वाढ नोंदविली गेली आहे असे स्टॉकहोम आंतरराष्ट्रीय शांती शोध संस्थेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
शस्त्र निर्यातीत अमेरिका अव्वल स्थानावर असून त्या पाठोपाठ रशिया आणि जर्मनीचा नंबर आहे. गेली पाच वर्षे चीन ३५ देशांना शस्त्रे निर्यात करत असून त्यात कनिष्ठ व मध्यम पातळीवरील देशांचा समावेश आहे. चीनची शस्त्र निर्यात वाढण्यामागे चीनमध्ये बनलेली शस्त्रे कमी किमतीत उपलब्ध होतात हे मुख्य कारण आहे. चीनच्या निर्यातीतील ३/४ हिस्सा पाकिस्तान, म्यानमार व बांग्लादेशात निर्यात केला जातो. चीन आता नायजेरियालाही शस्त्रे पुरवित आहे.