लंडन- ब्रिटनच्या शाही परिवारातील सदस्य प्रिन्स हॅरी यांच्याबरोबर लग्न करण्यासंदर्भात त्याची मैत्रिण क्रेसिडा बोनास द्विधा मनस्थितीत असल्याचे समजते. हॅरी आणि क्रेसिडा यांनी शुक्रवारी वेंबली अरेना मध्ये एका प्रसिद्ध कार्यक्रमात एकत्र हजेरी लावल्यामुळे लवकरच त्यांचा साखरपुडा होणार अशी चर्चा सुरू झाली होती.
क्रेसिडाने मात्र या बाबत आपल्या मित्रमंडळींशी बोलताना लग्न का करियर अशा द्विधा मनस्थितीत असल्याचे सांगितले आहे. २५ वर्षीय क्रेसिडा करियर का लग्न यातून निवड करता येत नसल्याने हैराण झाली असली तरी प्रिन्स हॅरिने मात्र तिच्यासाठी कितीही काळ थांबायची तयारी असल्याचे सांगितले आहे. क्रेसिडा हिला डान्सर बनायचे आहे आणि स्टेजचे तिला फार आकर्षण आहे. तिला महाराणीकडून अजून भेटीचे मिमंत्रणही मिळालेले नाही. डान्स का हॅरी यातून एकाची निवड कशी करणार असा तिच्यापुढे मोठा प्रश्न आहे.
हॅरी २९ वर्षांचा असून राजघराण्यात साधारणपणे या वयापर्यंत लग्न होते. मात्र क्रेसिडाची जोपर्यंत साखरपुड्यासाठी मानसिक तयारी होत नाही तोपर्यंत प्रतीक्षा करण्याची हॅरीची तयारी आहे कारण तो क्रेसिडामध्ये खूपच अडकला आहे असेही समजते.