गारपिटीनंतर चार शेतक-यांच्या आत्महत्या

बीड: गेल्या पंधरा दिवसापांसून राज्यात झालेली गारपीट शेतक-यांच्या जीवावर उठली असे दिसत आहे. विशेषता मराठवाडयात गारपिट व अवकाळी पाववसाने शेतक-याचे न भरुन येणारे नुकसान झाले आहे. त्यावमुळे शेतक-यात नैराश्यातचे वातावरण असून या गारपिटीमुळे आतापर्यंत लातूर, उस्मानाबाद, बीडमधील चार शेतक-यांनी आत्महत्या केली आहे.

बीडमधील आंबाजोगाई तालुक्यातील मांडवा गावात गारपिटीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीमुळे गेले काही दिवस निराश असलेल्या गारपीटग्रस्त शेतक-याने आत्महत्या केली आहे. आत्म हत्यास करणा-या शेतक-याचे नाव महादेव शेळके वय २० असे आहे. महादेवने घरात कोणीही नसताना गळफास घेवून आत्महत्या केली. महादेवचे आई-वडील हे उसतोड कामगार आहेत.

गारपिटीमुळे त्रस्त् झालेल्या नांदेड जिल्ह़ीयातील दोन शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. भोकर तालुक्यात मारुती झिल्लेवाड या २५ वर्षीय शेतक-याने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. याआधी लातूरमधील गारपीटग्रस्त शेतकरी भागवत माने यांनी आत्महत्या केली होती. शिरुर अनंतपाल तालुक्यातील उत्तरशेंड गावात ही घटना घडली.

त्यासोबतच औरंगाबाद जिल्ह़यातील कन्नड तालुक्यातील गोळेगावमधील संतुका गारोळे या शेतक-यांने गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीमुळे राहत्या घरी विष प्राशन करुन आत्महत्या केली.
उस्मानाबाद जिल्ह़षयातील कळंब तालुक्याकतील देवळाली येथील कर्जबाजारी शेतकरी राजेंद्र लोमटे यांनी स्वत:ला पेटवून घेऊन आत्मह्त्येचा प्रयत्न केला. या घटनेत ते ८० टक्के भाजले असून त्यांच्यावर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून ते गंभीररित्या भाजल्या ने मरणाशी झूंज देत आहेत.