
रामेश्वरम- श्रीलंकेतील मन्नार येथील न्यायालयाने आणखी 23 मच्छीमारांची त्यांच्या बोटींसह सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. प्रस्तावित भारत-श्रीलंका द्विपक्षीय चर्चेच्या पार्श्वभूमीवर लंकन सरकारने उचललेले हे पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात आहे. तत्पूर्वी श्रीलंकेतील एका न्यायालयाने 116 मच्छीमारांच्या सुटकेचे आदेश दिले होते.
