खोटयाचे पितळ उघडे पाडणारे सॉफ्टवेअर

खोटे बोलणार्‍यांनो, विशेषतः न्यायालयात खोट्या साक्षी देणार्‍यांनो आपली ही सवय आता आवरा. अन्यथा तुमच्या खोट्याचे पितळ उघडे पडू शकते. ब्रिटनमधील कोलवेस्ट विद्यापीठातील भाषातज्ञ मॅसिमो पाअॅसिओ आणि इटलीतील सेंटर फॉर माइंड अॅन्ड ब्रेन सायन्सच्या थोमास फार्नसिएरी या दोन संशोधकांनी खोटे उघड करणारे सॉफ्टवेअर विकसित केले आहे आणि त्याच्या चाचण्या यशस्वी झाल्या आहेत.

हे सॉफ्टवेअर न्यायालयात खोटी साक्ष दिल्यास, पुस्तकांची समीक्षा खोटीखोटी लिहिल्यास अथवा खोटे बोलत असल्यास त्याची त्वरीत परिक्षा करते आणि खोटेपणाचा अॅलर्ट देते.त्यासाठी स्टायलोमेट्री तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे. या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने एखाद्या मजकुरातील पॅरेग्राफमध्ये एक शब्द किती वेळा येतो त्यावरून एकूण मजकुरातला हा भाग दुसर्‍यांने लिहिल्याचे ओळखता येते. या सॉफटवेअरमुळे माहितीचा खरेखोटेपणाही पडताळता येणार आहे.

इटालीतील न्यायालयात साक्षीदारांच्या जबान्या या सॉफ्टवेअरमध्ये फिड केल्या गेल्या तेव्हा खोट्या साक्षी या सॉफ्टवेअरने अचूक ओळखल्या असे संशोधकांचे म्हणणे आहे. अर्थात हे सॉफ्टवेअर पूर्णपणे वापरता यावे यासाठी आणखी कांही सुधारणा त्यात केल्या जाणार आहेत.

Leave a Comment