न्यूयॉर्कमध्ये स्फोटामुळे इमारत कोसळली

न्यूयॉर्क- मॅनहॅटनमध्ये एका निवासी इमारतीत बुधवारी झालेल्या स्फोटात २ जण ठार तर १७ जण जखमी झाले. या इमारतीत झालेल्या प्रचंड स्फोटामुळे आजूबाजूच्या रहिवाशांना भूकंप झाल्यासारखे हादरे बसले. त्यामुळे गाढ झोपेत असलेले नागरिक घाबरून जागे झाले. स्फोटानंतर इमारतीमध्ये आग लागली. वायूगळतीमुळे हा स्फोट झाल्याची शक्यता अग्निशमन दलाच्या अधिका-यांनी व्यक्त केली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे अनेक जवान आणि बंब घटनास्थळी प्रयत्न करत होते. या इमारतीमध्ये लागलेल्या आगीचा धूर शेजारी असलेल्या रेल्वेस्थानकातही पसरला होता. त्यामुळे रेल्वेमार्गावरील वाहतूक रोखून धरण्यात आली होती.