
मुंबई – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचे चित्र, सही , नाव आणि २०० कसोटी अशी चिन्हे असलेली चांदीची नाणी येत्या १४ मार्चला बाजारात आणली जात आहेत. ही नाणी २०० ग्रॅम वजनाची आहेत. व्हॅल्यूमार्ट गोल्ड अॅन्ड ज्युवेल अॅन्ड डायमंड इंडियाने अशी १५९२१ नाणी बाजारात आणण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. हा आकडा म्हणजे सचिनने १९८९ ते २०१३ या २४ वर्षात खेळलेल्या कसोटी सामन्यातील रन्सची संख्या आहे.
