गेल्या अर्ध शतकाच्या तुलनेत अमेरिकेत सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचा वापर करणारे अमेरिकन प्रवासी वाढले असल्याचे अमेरिकन पब्लिक ट्रान्स्पोर्ट असोसिएशनच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. या आकडेवारीनुसार २०१३ सालात १०.७ अब्ज अमेरिकन नागरिकांनी या व्यवस्थाचा लाभ घेतला आहे. १९५६ सालानंतर सार्वजनिक वाहनांतून प्रवास करणार्या प्रवाशांचा हा मोठा आकडा आहे.
अमेरिकन नागरिकांनी बस, ट्रेन, सबवे ट्रेन या सर्व वाहनांचा प्रवासासाठी वापर केला आहे. ट्रान्स्पोर्ट विभागाचे सीईओ व अध्यक्ष मायकेल मेलानिफी म्हणाले की यापूर्वी अमेरिकन नागरिकांचा भर खासगी वाहन वापरण्यावर होता. मात्र आता बस, ट्रेन, सबवे ट्रेन यांचे नेटवर्क वाढले आहे आणि भविष्यात जाणविणार्या इंधन टंचाईची जाणीवही नागरिकांना झाली आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहनांचा प्रवासासाठी वापर करण्याचे प्रमाणही वाढते आहे.