सटटेबाजांनी दिला केजरीवालना सर्वाधिक भाव

मुंबई – लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आता सट्टेबाजारही चांगलाच तापू लागला आहे. सट्टेबाजांनी पंतप्रधानपदासाठी मोदी, राहुल गांधी व केजरीवाल यांनाच प्राधान्य दिले असून मोदींच पंतप्रधान होतील याविषयी खात्री दिली आहे. परिणामी मोदींना सर्वाधिक कमी म्हणजे केवळ ७५ पैसे भाव दिला गेला असून हाच भाव राहुल गांधी यांच्यासाठी ५ रूपये तर आपचे केजरीवाल यांच्यासाठी २०० रूपये आहे असे समजते.

निवडणुका जवळ येतील तशी राजकीय समीकरणे बदलत असतात मात्र सट्टेबाजांच्या दुनियेत सट्टेबाजच राजकीय पक्षांचे, नेत्यांचे भाव ठरवित असतात. यंदाच्या निवडणुकात भाजप बहुमतात येईल अणि मोदी पंतप्रधान बनतील असा सट्टेबाजांचा विश्वास आहे. त्यामुळे सट्टा भाजपला २२७ ते २२९ जागा व काँग्रेसला ६७ ते ६९ जागा यावरच लावला जात आहे. आम आदमीला  ११ ते १२ जागा यावर सट्टा घेतला जात आहे.

विशेष म्हणजे सट्टेबाजांनी युती किवा आघाडी सरकार यांच्याऐवजी भाजप, काँग्रेस आणि आम आदमी या तीन पक्षांवरच अधिक भर दिला असून त्यावरच रेट ठरविले आहेत.२०१४ च्या निवडणुकांतील जनादेश या तीन पक्षांवरच ठरेल असे सटोडियांचे म्हणणे आहे.

Leave a Comment