दीपक पायगुडे यांना भाजपा मदत करणार ?

पुणे – मोदींना पंतप्रधान करायचे तर आप च्या उमेदवारांविरोधात आणि काँग्रेस च्या विरोधात मोठ्ठी ताकद उभी करावयाची आहे या दृष्टीने म न से च्या उमेदवारांना जिथून चांगले सहकार्य करून निवडून आणता येईल तिथे तिथे सहाय्य करण्याचेच भाजपचे म्हणजे गडकरी यांचे धोरण असल्याचे दिसते आहे या दृष्टीने पुण्यात अनिल शिरोळे नको आणि गिरीश बापट हीनको असा खुद्द आता नितीन गडकरी यांनीच मार्ग काढला असल्याची माहिती येथे समजते आहे या अनुषंगाने गडकरी यांनी म न से शी छुपी युती केल्याचे येत्या काही दिवसात स्पष्ट होणार असल्याचे वृत्त आहे

दरम्यान दिल्ली मध्ये अरविंद केजरीवाल यांनी दिलेला दणका पुन्हा बसून हलाखीची अवस्था होवू नये म्हणून सारे चोर एकत्र येत असल्याचे वक्तव्य आप चे मारुती भापकर यांनी केलेले आहे ते म्हणाले , आप चा मोठ्ठा धसका भाजपने घेतला आहे . या पार्श्वभूमीवर समीक्षकही आपापले म्हणणे मांडीत आहेत , महागाईने नागरिकांचे कंबरडे मोडले आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी ला त्यास जबाबदार धरले जाते आहे ग्यास . पेट्रोल, आणि घरांच्या वाढत्या किमती ही मुलभूत गरजांची कारणे आहेत त्यामुळे सामान्य मतदार काँग्रेस -आणि राष्ट्रवादीला नाकारल्या शिवाय राहणार नाहीत. तसेच या पक्षांना पर्याय शोधण्याचा प्रयत्न मतदार करेल तेव्हा मतांचे विभाजन होवून दिल्ली सारखी अवस्था होवू नये यास भाजप घाबरते आहे त्यामुळे ते म न से ला जवळ करीत आहेत

काँग्रेस -राष्ट्रवादी ; महायुती आणि आप अशीच तिरंगी लढत व्हावी यासाठी भाजप प्रयत्नशील आहे अशा तिरंगी लढतीतून कोन्ग्रेस आणि आप ला हरविणे जड जाणार नाही असेच गडकरींचे धोरण दिसते आहे. त्यामुळे ‘सारेच भ्रष्टाचारी आहेत ‘ अशी भूमिका जाहीर करीत अरुण भाटीया यांनी ज्याप्रमाणे लोकप्रतिनिधी-अधिकारी यांच्या विरोधात धडक मोहीम राबविली होती या घटनेचा आणि त्याच्या परिणामांचा संदर्भ आता लोकसभेच्या लढाई ला देखील येवू पाहतो आहे . सारेच पक्ष आणि सारेच लोकप्रतिनिधी यांनी एकत्रित येवून तेव्हा अरुण भाटीया यांना महापालिकेतून धक्काबुक्की करीत हाकलून लावले होते . या लढाईत आता काँग्रेस ला पराजित करीत आप ला हाकलून लावण्याचा डाव भाजपचे गडकरी खेळत असल्याचा अंदाज व्यक्त होतो आहे

त्यासाठी त्यांनी शिवसेनेला अंधारात ठेवून आतून म न से ची आपली नाळ जोडून घेतल्याचे बोलले जाते आहे . शिवसेनाही तोडायची नाही आणि म न से ला हो मांडीवर घ्यायचे हे धोरण या लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी राबवीत असल्याचे दिसते आहे