क्वालंलपूर – मलेशिया एअरलाइन्सचे एक प्रवाशी विमान दक्षिण चीनच्या समुद्रात कोसळले आहे. मलेशियाची राजधानी क्वालंलपूर येथून चीनची राजधानी बिजींगसाठी चक३७० या विमानाने उड्डाण केले होते. यात चालक दलासह २३९ प्रवाशी होते.

व्हिएतनाम येथून मिळालेल्या माहितीनुसार, का माऊच्या हवाई हद्दीत प्रवेश केल्यानंतर एका मिनीटांत या विमानाचा एअर ट्रॅफिकसोबतचा संपर्क तुटला. या विमानात पाच भारतीय प्रवाशी देखील होते. त्यात एक महिलेचा समावेश आहे. व्हिएनामच्या वरिष्ठ नौदल अधिका-याने विमान समुद्रात कोसळल्याच्या वृत्ताल दुजोरा दिला आहे.
टुओ ट्रे वृत्तपत्राने नौदलाचे पॉलिटीकल कमिश्नर ऍडमीरल गो वेन फेट यांच्या हवाल्याने म्हटले आहे, की विमान थो छू बेटापासून ३०० किलोमीटर अंतरावर समुद्रात कोसळले आहे. मात्र, मलेशिया एअरलाइन्सने या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. फेट म्हणाले, व्हिएतनाम सरकारच्या वरिष्ठ अधिका-यांकडून आदेश आल्यानंतर बचाव कार्याला सुरवात केली जाईल. विमानात २२७ प्रवाशी आणि चालक दलाचे १२ सदस्य होते. विमानातील प्रवाशी हे विविध १४ देशांचे नागरिक होते. त्यातील १६० प्रवाशी हे चीनचे आहेत. यात दोन लहान मुलांचाही समावेश आहे. मलेशिया एअरलाइन्सने प्रवाशांच्या नातेवाइकांसाठी आपातकालिन क्रमांक सुरु केला आहे. +६०३ ७८८४ १२३४ या क्रमांकवर प्रवाशांचे नातेवाइक संपर्क करु शकतात.