पेशावर – पाकिस्तानच्या आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच अल्पसंख्याक हिंदू समाजातील विधवांना अर्थसहाय्य देण्याची तजवीज करण्यात आली आहे. खैबर पख्तून सरकारचे मुख्य सल्लागार सरदार सूरनसिंग या संदर्भात म्हणाले की सरकारच्या या मदतीमुळे अल्पसंख्याक समुदायातील महिलांना फायदा होणार आहे.
कालीबारी हिंदू मंदिर परिसरात हिदू विधवांना चेकचे वाटप नुकतेच करण्यात आले त्यावेळी सूरनसिंग म्हणाले की पाक सरकारला अल्पसंख्यांक समुदायांना येत असलेल्या अडचणींची जाणीव आहे आणि या अडचणी दूर करण्यासाठी विविध उपाययोजनाही केल्या जात आहेत. हिदू विधवांना आर्थिक सहाय्य हा या योजनेचाच एक भाग आहे. आणखी काही कल्याणकारी योजनाही अमलात आणल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले.