ऑस्लो – यंदाच्या वर्षी दिल्या जाणार्या नोबेल पुरस्कारात शांततेसाठी दिल्या जाणार्या पारितोषिकासाठी यंदा २७८ नामांकने आली असून हा विक्रम आहे. हे पुरस्कार आक्टोबरमध्ये जाहीर केले जातात.

ऑस्लो – यंदाच्या वर्षी दिल्या जाणार्या नोबेल पुरस्कारात शांततेसाठी दिल्या जाणार्या पारितोषिकासाठी यंदा २७८ नामांकने आली असून हा विक्रम आहे. हे पुरस्कार आक्टोबरमध्ये जाहीर केले जातात.
नोबेल इन्स्टिट्यूटचे प्रमूख गेर लुडस्टांड या संदर्भात म्हणाले की दरवर्षी नामांकनात वाढच होताना दिसत आहे. याचाच अर्थ हा पुरस्कार जगभरात मान्यता पावलेला आणि लोकप्रिय पुरस्कार आहे. जगाच्या बहुतेक भागातून, देशांतून या पुरस्कारासाठी नामांकने पाठविली जातात. नामांकने पाठविण्याची अंतिम तारीख १ फेब्रुवारी असते. त्यानंतर संस्थेच्या पाच सदस्यांनी बैठक होते त्यात सदस्यही नावे सुचवू शकतात.त्यातून अंतिम निवड केली जाते. ही नावे गुप्त ठेवली जातात.
गतवर्षीही शांततेच्या पुरस्कारासाठी २५९ नांवे आली होती आणि तोही त्यावेळी विक्रमच होता. यंदा हा विक्रम मोडला गेला आहे.