लंडन – लंडनच्या इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटकडून २०१४ साठी केल्या गेलेल्या सर्वेक्षणानुसार भारताची आर्थिक राजधानी मुंबई हे जगातील सर्वात स्वस्त शहर म्हणून पुढे आले आहे. या यादीत दिल्लीचा नंबर तिसरा आहे. जगातील सर्वात महाग शहर म्हणून सिंगापूर प्रथम स्थानावर आहे.
या सर्वेक्षणानुसार भारतातील मुंबई सर्वाधिक स्वस्त शहर ठरण्यामागे कांही कारण आहेत. या शहरात सर्वात श्रीमंत आणि सर्वात गरीब असे दोन्ही तर्हेगचे लोक असून ही आर्थिक विषमता जगात सर्वात अधिक आहे. त्यामुळे मजुरीच्या किमती कमी आहेत तसेच भारत सरकार आर्थिक दुर्बलांसाठी तसेच नागरिकांना विविध उत्पादनांसाठी जाहीर करत असलेल्या सब्सिडी हेही येथे स्वस्ताई असण्यामागचे कारण आहे. सब्सिडीमुळे नागरिकांचा खर्च कमी होतो.
स्वस्त शहरांमध्ये पाकिस्तानातील कराची दोन नंबरवर आहे. सिरीयातील दश्मिक आणि नेपाळची राजधानी काठमांडू अनुक्रमे चार व पाच नंबरवर आहेत. हे सर्वेक्षण करताना विविध क्षेत्रातील १६० उत्पादने आणि सेवा क्षेत्रांचा विचार केला जातो.