युक्रेनमध्ये रशियन फौजा घुसवणार

मॉस्को – रशियाचे अध्यक्ष ब्लादमीर पुतीन यांच्या युक्रेनमध्ये सेना घुसविण्याच्या प्रस्तावाला रशियाच्या पार्लमेंटने मान्यता दिली आहे. अमेरिकेने याबाबत रशियाला धोक्याचा इशारा दिला आहे आणि रशियाने युक्रेनमध्ये सेना घुसवल्यास रशियाला ते महागात पडेल, असे बजावले आहे. पण तरीही अध्यक्ष ब्लादमीर पुतीन हे युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याच्या विचारात आहेत.

युक्रेन हा रशियाने पूर्वी निर्माण केलेल्या सोविएत संघाचाच एक घटक परगणा होता. मात्र १९९० साली सोविएत संघाचे विघटन होऊन घटक राज्ये वेगळी झाली, त्यावेळी युक्रेन सुद्धा सोविएत संघातून फुटून निघाला. ही विघटन होत असताना रशियाने युक्रेनचा काही भाग बळकावला असा युक्रेनमधल्या मुस्लीम संघटनांचा आरोप आहे.

या वादामुळे युक्रेनमधले दहशतवादी रशियात येऊन नेहमीच घातपाती कारवाया करत असतात. ही समस्या कशी हाताळावी या प्रश्‍नाने रशियन नेते व्यग्र झाले आहेत. त्यामुळे त्यांनी आता युक्रेनमध्ये सेना घुसवून तिथल्या या दहशतवाद्यांचा पारिपत्य करण्याचा निर्णय घेतला आहे.