बीजिंग – चीनच्या युनान परगण्यातील कुनमिंग रेल्वे स्थानकावर काळा वेश परिधान केलेल्या अज्ञात दहशतवाद्यांनी केलेल्या स्वैर भोसकाभोसकीत २७ जण ठार झाले तर १०९ जण जखमी झाले. शनिवारी सकाळी हा प्रकार घडला, अशी माहिती झिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिली आहे.

काही अज्ञात दहशतवादी काळ्या वेशात या स्टेशनच्या परिसरात घुुसले आणि त्यांनी दिसेल त्याला भोसकायला सुरुवात केली. मात्र ते दहशतवादी नेमके कोण होते आणि त्यांचा या कृत्यामागचा हेतू काय, यावर काही प्रकाश पडला नाही. मात्र चिनी संसदेच्या बुधवारी सुरू होणार्या बैठकीच्या आधी हा हल्ला झाला याला महत्व दिले जात आहे.
चीनच्या वायव्य भागातील झेनझियांग परगण्यातून हे अतिरेकी आले असावेत असा अंदाज आहे. या परगण्यात वुईघूर मुस्लीम स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. हे आंदोलन ईस्ट तुर्केस्तान इस्लामिक मुव्हमेंट या संघटनेच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. ही संघटना अल् कायदाशी निगडित आहे. गेल्या वर्षी या संघटनेच्या दहशतवाद्यांनी बीजिंगच्या तियानमेन चौकात अशाच प्रकारचा हल्ला करून तिघांना ठार मारले होते.