ब्रुसेल्स – २८ देशांचा गट असलेल्या नाटोच्या इतिहासात प्रथमच पाच सदस्य देशांच्या महिला संरक्षणमंत्री आपली सेवा रूजू करत आहेत. बुधवारी येथे नाटोच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत या पाच जणींचे दर्शन झालेच पण त्यांनी आपला एकत्र फोटोही काढून घेतला.

यापूर्वी चार देशांच्या महिला संरक्षण मंत्री होत्या त्यात आता इटलीतील संरक्षणमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारलेल्या रोबर्टा पिनोटी यांची भर पडली आहे. रोबर्टा यांनी इटलीच्या पहिल्या महिला संरक्षणमंत्री पदाचा मान मिळविला असून ५२ वर्षीय रोबर्टा यानी यापूर्वी इटली सरकारमध्ये उपमंत्र्यांची जबाबदारी पार पाडली आहे. दोन दशकांपूर्वी त्यांनी त्यांच्या राजकीय जीवनाची सुरवात केली आहे.
अल्बानियाच्या मिमी कोडेली, जर्मनीच्या अर्यल वॉन, नॉर्वेच्या इने मेरी, नेदरलँडच्या जेनी हेन्निस यांचा अन्य महिला संरक्षण मंत्र्यांत समावेश आहे. नाटोच्या इतिहासात प्रथमच एकावेळी संरक्षण मंत्री पदावर पाच महिला काम करत आहेत.