दिल्ली – सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी महागाई भत्ता सध्याच्या ९० टक्कयांवरून १०० टक्क्यांवर नेला जाणार असल्याचे वृत्त आहे. या संबंधीच्या प्रस्तावास केंद्रीय मंत्रीमंडळाच्या या आठवड्यात होत असलेल्या बैठकीत मंजुरी दिली जाईल. याचा फायदा ५० लाख सरकारी कर्मचारी आणि ३० लाख पेन्शनरना होणार आहे. या आठवड्याच्या बैठकीत हा विषय अजेंड्यावर घेण्यात आला असल्याचेही सांगितले जात आहे.
मार्चच्या पहिल्या वा दुसर्या आठवड्यात निवडणूक आचारसंहिता लागू होणार आहे. त्यापूर्वीच हा निर्णय घेतला जाईल असे समजते. महागाईभत्त्यात १० टक्के वाढ करण्याची ही दुसरी वेळ असून पहिल्यांदा सप्टेंबर २०१३ मध्ये अशी १० टक्के वाढ केली गेली होती. आता नव्याने होणारी वाढ जानेवारी २०१४ पासून लागू होणार आहे. अर्थात निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच हा निर्णय घेतला जात असल्याची टीका विरोधकांनी केली आहे.