अमेरिकन निवडणुकांत यंदा १० भारतीय वंशाचे उमेदवार

र्वॉशिग्टन – अमेरिकेत २०१४ सालात होणार्‍या सार्वत्रिक निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होणार असल्या तरी या निवडणुकीसाठी उमेदवारांची आत्तापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यंदा भारतीय वंशाचे १० उमेदवार या निवडणुका उतरणार आहेत. अमेरिकी काँग्रेसमन अमी बेरा यंदा तिसर्‍या वेळी कॅलिफोर्नियाच्या निवडणुकीत उतरणार आहेत.

कमल हॅरिस या कॅलिफोर्नियाच्या अॅटर्नी जनरल निवडणूकीत पुन्हा एकदा नशीब अजमावत आहेत तर रिपब्लीकन कडून नील काशकरी कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नर पदासाठी निवडणूक लढविणार आहेत. ओबामा प्रशासनात माजी उप सहाय्यक सचिव म्हणून काम पाहिलेले रोव खन्ना व रिपब्लीकन तर्फे वनीला माथूर एकाच जागेसाठी लढणार आहेत. उपेंद्र चिवकुल न्यू जर्सी मधून, इराक युद्धात सामील झालेले माजी सैनिक मनन त्रिवेदी पेन्सिलवेनियातून लढणार आहेत.

विस्कोन्सिन मधून सतवंत गुरूद्वारचे माजी अध्यक्ष सतवंत कालेका यांचे पुत्र अमरदिप कालेका रिंगणात आहेत. सतवंत यांचा या गुरूद्वारात झालेल्या गोळीबारात मृत्यू झाला होता. स्वाती दांडेकर लोवा मधून तर मंजू गोयल इलिनॉईस मधून निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.