डॉ. पी. बी. पाटील यांचे निधन

सांगली – महाराष्ट्रातील थोर विचारवंत शिक्षणतज्ञ, पंचायत राज व्यवस्थेचे प्रणेते आणि नवेगाव आंदोलनाचे प्रणेते प्रा. डॉ. पी. बी. पाटील यांचे आज, रविवारी सांगली येथे निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. डॉ. पाटील गेली दोन वर्ष कर्करोगाने आजारी होते. शांतीनिकेतन लोकविद्यापीठाचे संस्थापक असलेले डॉ. पाटील यांनी या भागातील शिक्षण आणि ग्रामविकासात मोलाचे योगदान दिले होते. डॉ. पाटील आणि त्यांच्या मित्रांनी ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांसाठी १९५३ साली इस्लामपूर येथे होस्टेल बांधले होते. डॉ. पी. बी. पाटील यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी हुतात्मा स्मारकावर ठेवण्यात आले आहे.